राजस्थान निवडणूक: कॉंग्रेसचा जाहीरनामा मूर्ख बनविणारा-भाजपचे आरोप

0

जयपुर-राजस्थान विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आज कॉंग्रेसने पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावर भाजपने कॉंग्रेसवर निशाना साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी कॉंग्रेसचे घोषणापत्र मूर्ख बनविण्याचा प्रकार आहे अशी टीका केली आहे. कॉंग्रेसच्या घोषणापत्रात काहीही गंभीरता नाही असे आरोप त्रिवेदी यांनी केले आहे.

कॉंग्रेसच्या घोषणापत्राचे नाव ‘जन-घोषणा पत्र’ असे ठेवण्यात आले आहे. भाजपने देखील जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने ‘गौरव संकल्प पत्र’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

राजस्थानसाठी कॉंग्रेसचा जाहीरनाम प्रसिद्ध; शेतकरी, महिला अग्रस्थानी !

 

Copy