राजस्थानी महिला मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर

0

एरंडोल। येथील राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले बालसंस्कार शिबीर उत्साहात पार पडले. शिबिरात पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते. बालसंस्कार शिबिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगासन,बुद्धिबळ,सुंदर हस्ताक्षर,रोजनिशी,याबाबत माहिती देऊन मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले. शिबिरात श्वेता काबरा यांनी ‘वेस्ट से बेस्ट’ या उपक्रम अंतर्गत पेन्सिल बॉक्स तयार करणे, फोटो फ्रेम बनविणे, लेटर पॅड तयार करणे, प्रेझेंट पाकीट तयार करणे हे प्रात्यक्षिकासह करून दाखविले.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप
प्रदेशाध्यक्षा विजया जाजू यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप करण्यात आला. श्रीमती जाजू यांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला बाहेती यांनी प्रास्तविक करून मंडळातर्फे आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमांची माहिती दिली. राजस्थानी महिला मंडळाच्या सचिव मिना मानुधाने यांनी सुत्रसंचलन केले. शिबिरात पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ.उज्ज्वला राठी, पुष्पा बिर्ला, श्रुती काबरा, मीरा जाखीटे यांनी सहकार्य केले.