राजस्थानमध्ये सत्तांतर अटळ-हार्दिक पटेल

0

गांधीनगर-राजस्थानच्या जनतेने भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे यावर्षी राजस्थानमध्ये सत्ताबदल अटळ आहे असे भाकीत गुजरात पाटीदार आंदोलन नेते हार्दिक पटेल यांनी वर्तविले आहे. राजस्थानमध्ये भाजप विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याचे हार्दिक पटेल यांनी सांगितले.

लोकांच्या मनात भाजपबद्दल नाराजी आहे, तशी प्रतिक्रिया देखील लोकांच्या मनातून व्यक्त होत आहे. विशेष युवकांसाठी भाजपने काहीही केलेले नसल्यामुळे युवकांच्या मनात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.

Copy