राजमाता जिजाऊ व विवेकानंदांना अभिवादन

0

भुसावळ । परिसरातील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, संघटनांतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.

स्वामी विवेकानंद स्कूल, निंभोरा
येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे हे होते. विद्यार्थी मानस पवार, रिया पवार, तनवी काटोले, वेदांत दोडके, अनुष्का चौधरी, निखिल नेमाडे, सानिका पाटील, सुजान शेख, फईज मन्यार, रुचिता दोडके, कुणाल बारी यांसह पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर विचार मांडले. तसेच प्रल्हाद बोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. दत्तात्रय पवार हे प्रमुख पाहुणे होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन चैतन्य कोंडे यांनी केले. आभार दिलशाद खान यांनी मानले.

सु.रा. कदम शाळा, वरणगाव
येथील सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भाषणे, वेशभूषा, गाणी, रांगोळी व निबंध स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस.एस. चौधरी होत्या. रांगोळी स्पर्धेत 40, निबंध स्पर्धेत 20 आणि वेशभूषा स्पर्धेत 17 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात निजबोध माळी या विद्यार्थ्याने उत्तमरित्या वेशभूषा व स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर माहिती सादर केली. योगीता पाटील, रेशमा पाटील, कामिनी डोयसे, नरेंद्र महाजन, ऋषीकेश पाटील, हर्षाली सावळे, योगीता लोणारी, सृष्टी नारखेडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी व्ही.एम. जोशी, व्ही.पी. झोपे, आर.आर. चौधरी, शिवाजी पाटील यांचे सहकार्य लाभले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, रावेर
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ मातेच्या प्रतिमेस लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहमंद जफर मोहमंद यांनी पुष्पहार अर्पण केला तर दिप व धुप पुजा नगरसेवक तथा वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश घेटे यांनी केली. यावेळी नगरसेविका संगीता अग्रवाल, माजी उपनगराध्यक्षा संगीता घेटे, काँग्रेस तालुका महिला आघाडी अध्यक्षा छाया पाटील, मुन्ना अग्रवाल, श्रावण घेटे, अशोक घेटे, महेमुद यांसह वाचक उपस्थित होते. सुत्रसंचालन राजेंद्र अटकाळे यांनी तर आभार ग्रंथपाल निलेश तायडे यांनी मानले.

टोकरे कोळी महासंघ
गणपती नगरातील आदिवासी टोकरे कोळी महासंघातर्फे जयंती साजरी करण्यात आली. सुभाष सपकाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. युवा जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे, किरण तावडे, विकास सपकाळे, विनोद सोनवणे, देवेंद्र कोळी, विलास कोळी, संजय सोनवणे, निलेश भारंबे, संजय चौरसिया, अंकित शर्मा
उपस्थित होते.

खिर्डी जिल्हा परिषद उर्दू शाळा
येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रोशन मन्यार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक अहेमद खान समद खान, उपशिक्षक अनीस खान, ऐजाज़ अहेमद, जावीद खान, रिज़वान खान, शेख इद्रीस उपस्थित होते.