राजमाता जिजाऊंसह विवेकानंदांना मानवंदना

0

भुसावळ । शहर व परिसरातील विविध संस्था, संघटनांतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. तसेच काही विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी सजीव देखावे सादर करुन दोन्ही विभुतींना मानवंदना दिली.

नगरपालिका
पालिका सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक रमेश नागराणी, परिक्षित बर्‍हाटे, राजेंद्र आवटे यांसह पालिका कर्मचार्‍यांची
उपस्थित होती.

मराठा क्रांती मोर्चा
भुसावळ शहर व तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. टिंबर मार्केटजवळील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्ष महेंद्र पाटील, ललित मराठे, राजेंद्र आवटे यांनी प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी अ‍ॅड. तुषार पाटील, आनंद ठाकरे, राजेंद्र चौधरी, नरेंद्र पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संजय कदम, ज्ञानेश्‍वर जगदाळे, ईश्‍वर पवार, किशोर शिंदे, नरेश पाटील, अशोक पाटील यांनी परिश्रम घेतले.

डॉ. आंबेडकर वाचनालय
येथे संस्थेचे अध्यक्ष प्रा. उत्तम निकम व सचिव विमल निकम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रा. निकम यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याबद्दल आपले विचार मांडले. याप्रसंगी गोपाळ भंगाळे, राज देवगडे, मोहन नारखेडे, आर.आर. कुरपडे, वामन नेमाडे, विलास शेगावकर, विजय तायडे, विनोद तायडे आदी उपस्थित होते.

अंतुर्ली येथील सार्वजनिक वाचनालयात प्रतिमा पूजन
तालुक्यातील अंतुर्ली येथील सार्वजनिक वाचनालय व कर्की येथील ज्ञानोदय विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. अंतुर्ली वाचनालयात अध्यक्षस्थानी ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष एस.ए. भोई होते. यावेळी भोई यांनी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. सुत्रसंचालन डी.व्ही. बारी यांनी केले तर आभार शरद महाजन यांनी मानले. यावेळी अनिल वाडीले, रघुनाथ पाटील, पोलीस पाटील किशोर मेढे, भानुदास पाटील, भाऊराव महाजन, लिलाबाई पवार, ग्रंथपाल मधुकर वानखेडे, अनिल न्हावकर, शांताराम महाजन, सुमित वाडीले, नामदेव भोई उपस्थित होते.

विवरा येथे कार्यक्रम
येथे राष्ट्रीय मानवाधिकार महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा. संजय मोरे व मित्र परिवारातर्फे जयंती साजरी करण्यात आली. छोटू पाटील व प्रा. संजय मोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विजय पाटील, राजेंद्र पाटील, पंडीत पाटील, किशोर पाटील यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी देवलाल पाटील, उपसरपंच संजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.

अहिल्यादेवी कन्या विद्यालय
येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थीनींनी जिजामाता व विवेकानंद यांच्या वेशभूषा साकारुन भाषणे सादर केली. मुख्याध्यापिका प्राची देसाई, पर्यवेक्षक सुरेश शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. रुचिका ठाकूर, पल्लवी पाटील, अनुष्का आंबेकर, गौरी इखे, मानीनी माहुरकर या विद्यार्थीनींनी तसेच पल्लवी पाटील, अर्चना पाटील, विनोद उबाळे, कैलास गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

ज्ञानोदय विद्यालय, कर्की
येथे अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.एस. वानखेडे होते. एस.एस. वाडीले, व्ही.आर. भोकरीकर यांनी मार्गदर्शन केले. संचलन एस.के. तायडे व समाधान खर्डे यांनी केले. प्रसंगी राहुल भोई, निलेश पाटील, सचिन पाटील, आर.सी. पाटील, हरी बाविस्कर उपस्थित होते.