‘राजपुत्र’ अमित ठाकरेंची राजकारणात लाँचिंग; नेतेपदी निवड झाल्यानंतर मांडला पहिला ठराव !

0

मुंबई: मनसेचे महाअधिवेशन आज गुरुवारी होत आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा राजकारणात खऱ्या अर्थाने प्रवेश होतो आहे. अमित ठाकरे यांना राजकारणात लाँच करण्यात आले आहे. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी घोषणा केली. त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. आजच्या अधिवेशनात अमित ठाकरे यांनी प्रथमच राजकीय ठराव मांडला. यावेळी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अमित ठाकरे हे व्यासपीठावर बोलण्यासाठी आले तेंव्हा त्यांच्या मातोश्री भावूक झाल्याच्या पाहायला मिळाल्या.

अमित ठाकरे यांनी पहिला ठराव हा शिक्षणाचा मांडला. परवडणाऱ्या आणि हक्काचे शिक्षण सर्वांना मिळावे, लहान मुलांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याची अंमलबजावणी व्हावी, राज्यात क्रीडा विद्यापीठ व्हावे आदी ठराव अमित ठाकरे यांनी मांडले.

Copy