राजकीय पुढार्‍यासह बड्या व्यावसायिकांच्या मद्यविक्रीच्या दुकानांवर छापे

0

जळगाव : लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री तसेच तस्करी करणार्‍या आर.के.वाईन्सवर कारवाई करण्यात आले. या हॉटेलाचा परवाना रद्द करण्यात येवून यात सहभागी पोलिसांचा बडतर्फ करण्यात आले. यानंतर अमळनेरातील मद्यव्रिकीच्या दुकानांचीही तपासणी करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात जळगावातील सील केलेल्या मद्य विक्रीच्या दुकानांची तपासणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागांकडून शनिवारी एकाचवेळी शहरातील मद्य विक्रीच्या दुकानांसह गोदामावर छापे टाकण्यात आले. यात आमदारांच्या दुकानांसह बड्या व्यावसायिकाच्यांही दुकानाचा समावेश असून कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उशिरापर्यंत मद्य साठ्याची तपासणी सुरु होती.

आमदारासंह या व्यावयासिकांच्या दुकानांची तपासणी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी एकाच वेळी आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी व मुलाच्या नावावर असलेल्या मद्य विक्री दुकान व गोदामांवर छापे घातले. आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्स, मुलगा विशाल सुरेश भोळे यांच्या नावावर असलेले नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, त्याशिवाय गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन्स, भागवत भंगाळे यांच्या मालकीचे बांभोरी येथील विनोद वाईन्स व नंदू आडवाणी यांच्या मालकीचे पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी करण्यात आली. . परवाना रद्दसह तीन कर्मचार्‍यांना बडतर्फमुळे मुळे चर्चेत असलेल्या आर.के.वाईन्सचे मालक नोतवाणी यांच्या नशीराबादच्या विजय सेल्सचाही समावेश आहे. निरीक्षक किरण पाटील, नरेंद्र दहिवडे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, व्ही.एम.माळी यांच्यासह नाशिकचे भरारी पथकाकडून ही तपासणी सुरु होती.

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी दिले होते निवदेन
माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी शहरातील सर्व मद्य विक्रीच्या दुकानांची तपासणी करण्याची मागणी केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे , महानगर अ‍ॅड. कुणाल पवार, राजू सोनार यांनी शहरातील लॉकडाऊनच्या काहात सिल केलेल्या विनोद वाईन्स, विजय वाईन्स, रामा ट्रेडर्स, सोनी ट्रेडर्स, निलम वाईन्स तसेच इतर वाईनशॉपच्या गोदामांमधील मद्यसाठा तपासण्यात यावा अशी मागणी केली होती. अमळनेरात तपासणी केली मग जळगावात का नाही? कोणाचा दबाव आहे का? असे सवालही पदाधिकार्‍यांनी उपस्थित केले होते. तसेच तपासणी करुन दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करावेत. तपासणी न केल्यास न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता. सदरच निवेदन 25 एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना देण्यात आले होते. निवेदनाच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाच्या नाशिकच्या पथकांकडून जळगावात शनिवारी अचानकपणे छापे टाकण्यात येवून तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

Copy