राजकीय द्वेषातूनच देवा सोनारांची बदनामी; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0

धुळे। शहरातील देवेंद्र सोनार यांचे विरोधात केवळ राजकीय द्वेषातून बदनामी करण्याचा उद्योग सुरु आहे. लोकसंग्राम आणि राष्ट्रवादीचे सतत पोस्ट वॉर सुरु असते. त्यात उभय पक्षातील पदाधिकारी अश्‍लील पोस्ट टाकत होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना गुन्हा का दाखल करावासा वाटला नाही.

सखोल चौकशी करुनच कारवाई करावी, अशी मागणी महिलांसह युवकांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देवून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा केवळ राजकीय द्वेषातून असल्याने त्याची सखोल चौकशी करावी मगच कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना योगेश शिंदे, रुपेश पवार, आनंद सोनार, सागर वाघ, मयुर वाघ, हर्षल गवळी, बाळा मराठे, सचिन सोनार,मंगेश पाटील, कल्पेश शिंदे, कुणाल सोनार, सचिन मराठे, दीपक सोनवणे, गणेश चौधरी, हर्षल सोनार, प्रेम सोनार, सागर चौधरी, मयुर गवळी, अजय सोनार, रवि कुळकर्णी, प्रविण पाटील,संदीप जैन, भरत मराठे, विक्की भोकरे आदींची उपस्थिती होती.