Private Advt

राखी सावंतला जीवे मारण्याची धमकी

0

मुंबई : कॉंट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत नेहमी आपल्या वागण्यामुळे आणि कंमेंट्समुले चर्चेत असते. नुकतेच तिने नाना तनुश्री वादात घेतलेल्या उडीमुळे ती आणखी एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने नानांची पाठराखण करत सेटवर घडलेला प्रकार सांगितला.

यामुळे तनुश्रीच्या समर्थकांनी आपल्याला कॉल करुन जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केल्याचा आरोप राखीने केला आहे. या प्रकरणात तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

राखीने पोलिसांकडे लेखी तक्रार देतानाचा याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. नाना पाटेकर आणि मनसेची पाठराखण केल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा दावा यावेळी तिने केला.