Private Advt

राकाँ महानगरतर्फे कार्यकर्ता संपर्क अभियान सुप्रीम कॉलनी येथुन अभियानाला सुरूवात

जळगाव – खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षपदाधिकारी यांनी कार्यकता संपर्क अभियान राबविण्याचे आदेश आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी महानगरतर्फे कार्यकर्ता संपर्क अभियानास सुरूवात झाली.
सुप्रीम कॉलनी येथुन कार्यकता संपर्क अभियान व सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले.कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या उपस्थित सुप्रीम कॉलनी येथील नागरिका सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक तास संपर्क अभियानात युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी पदाधिकार्‍यांकडे अनेक समस्यांविषयी चर्चा केली. त्यावर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी महानगर सरचिटणीस सुनिल माळी, विशाल देशमुख, उपाध्यक्ष यशवंत पाटील, अल्पसंख्याक जिल्हा महानगराध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, राहुल पाटील, महेश जाधव, छोटू राठोड, चिटणीस आकाश विश्वे, सुशील शिदे, राहुल टोके, सुहास चौधरी, ईश्वर चौव्हाण, विरु राठोड, शुभम राजपूत, सदिप राठोड, विशाल राजपूत, सुनिल हारणे इतर पदाधिकारी कार्यकते नागरिक उपस्थित होते.