Private Advt

रांजणगावचा दुचाकी चोरटा जाळ्यात : चोरीच्या दोन दुचाकी जप्त

चाळीसगाव : चोरीच्या दोन दुचाकींसह चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावच्या दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली. रतन दगडू अहिरे (41, रांजणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशय येताच आवळल्या मुसक्या
रांजणगावचे रहिवासी अलीम कुतूबुद्दीन टकारी (37) यांची दुचाकी (एम.एच.19 डी.एक्स.6217) ही मंगळवार, 3 मे रोजी रात्री चोरीस गेली होती. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान संशयीत आरोपी रतन दगडू अहिरे (41, रांजणगाव) याने दुचाकी चोरी केल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले.

चोरीच्या दोन दुचाकी जप्त
पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार, सहायक फौजदार राजेंद्र साळुंके, हवालदार नितीन सोनवणे, शंकर जंजाळे, मनोज पाटील, संदीप माने, संदीप पाटील यांनी कारवाई करत संशयीत आरोपी रतन अहिरे याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आली. आरोपी रतन अहिरे यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नितीन सोनवणे करीत आहेत.