रांगोळीतून साकारली भव्य आदिशक्ती

0

पाचोरा शिवसेना महिला आघाडी यांचा उपक्रम
पाचोरा – येथील पाचोरा-भडगाव तालुका शिवसेना महिला आघाडीतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त रांगोळीच्या माध्यमातून भव्य आदिशक्ती जगदंबा साकारली असून या भव्यदिव्य कलेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. शहरातील आशीर्वाद हॉलमध्ये स्थानिक कलावंत जितेंद्र काळे, राहुल पाटील, निरंजन शेलार, सुबोध कांतायन, करण पवार यांनी मोठ्या कल्पकतेतून दहा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर दोन हजार 100 किलो रांगोळी वापरून ही महाकाय आदिशक्ती साकारली आहे. 41 बाय 90 आकाराची ही आदिशक्तीची रांगोळी उत्कृष्ट रांगोळीच्या रंगछटांनी अत्यंत देखणी व मनोहरी झाली आहे.

नारीशक्तीचे घडले दर्शन
नारीशक्तीचे सामर्थ्य सिद्ध व्हावे व देवी जगदंबा ही नारी शक्तीचे प्रतिक आहे, अन्यायाविरुद्ध लढून प्रसंगी दृष्ट प्रवृत्तीचा नाश करून नारी शक्तीचे महत्त्व आणि महात्म्य सिद्ध करणाऱ्या आदिशक्ती जगदंबेचे राक्षसाचा वध करणारे चित्र रांगोळीच्या विविध रंगछटांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. आकर्षक विद्युतरोषणाई प्रसन्न वातावरण आदिशक्ती जगदंबे चे महत्व स्पष्ट करणारी ध्वनिफीत दर्शन घेण्यासाठीचे सुयोग्य नियोजन दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक महिला व युवतीस हळदी कुंकू हे सौभाग्याचे लेणे लावून तसेच सुमारे 25 हजार बुंदीच्या लाडूचा प्रसाद भाविकांमध्ये वितरित केला जाणार आहे.

भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन
नवरात्रीचे नऊ दिवस या महाकाय आदिशक्तीचे दर्शन खुले राहणार असून त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. या भव्यदिव्य कलेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणर असल्याची माहिती आमदार किशोर पाटील, अॅड. दिनकर देवरे, उपजिल्हाप्रमुख प्रा.गणेश पाटील यांनी माहीती दिली.

– फोटो आहे

Copy