रस्ते दर्जेदार होण्यासाठी अगोदरच नियोजन करा

0

चोपडा । तालुक्यातील चहार्डी ते अकुलखेडा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दर्जेदार व चांगले व्हावे या दृष्टीने अधिकार्‍यांनी नियोजन करावे अशी सूचना आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. बहुतांश कंत्राटदार व अधिकार्‍यांमार्फत मलीदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. त्यामुळे अल्पावधीतच रस्ते खराब होतात. रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे तसेच चांगल्या प्रतिचे काम करण्याची तंबी आमदारांनी अधिकार्‍यांना दिली. आमदार सोनवणे यांच्या हस्ते चहार्डी येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीसमोर रस्त्यावर डांबर कार्पेट थर टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सरपंच उषाबाई पाटील, पंचायत समिती उपसभापती एम व्ही पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, दीपक जोहरी, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, संगीता कोळी, प्रमिलाबाई पाटील, विनायक पाटील, डॉ अनिल पाटील, उपसरपंच प्रशांत पाटील, सुधाकर पाटील, कौस्तुभ तिवारी, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता चव्हाण, नगरसेवक महेश पवार, किशोर चौधरी, आबा देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.