रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त रॅली

0

चाळीसगाव । रस्ता वाहतुकीचे नियम नागरिकांनी पाळावे व नागरिकांना वाहतूक नियमांची माहीती व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह 2017 निमित्ताने चाळीसगांव शहर वाहतुक शाखेच्या वतीने शुक्रवार 20 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी शहरातून पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांसह राष्ट्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश शिरसाठ व कर्मचारी आणि राष्ट्रीय विद्यालयाचे विद्यार्थी यांनी ही रॅली काढली होती. या रॅलीत विद्यार्थ्यांनी घोषणा देवून वाहतूक बाबतीत जनजागृती केली.

वाहतूक नियमासोबत हेल्मेट वापसासाठीचे केले आवाहन
या रॅलीमधून नागरिकांना वाहतूक नियमांची माहीती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत हेल्मट वापरा, अति घाई संकटात नेई, वेग आवरा जिवाला सावरा, नियमांचे पालन करा, अशा घोषणाबाजी करत शहरातील ठिकठिकाणी रॅली थांबवून नागरिकांना वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत होते. रॅलीची सुरूवात सायंकाळी 4 वाजता येथील राष्ट्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन करण्यात आली. रॅली राष्ट्रीय विद्यालय, गणेश रोड, स्टेशनरोड मार्गे समारोप राष्ट्रीय विद्यालयात करण्यात आला. यावेळी सपोनि सुरेश शिरसाठ यांनी उपस्थितांना वाहतुक नियमांसंदर्भात सविस्तर माहीती दिली तर वाहतूक शाखेच्या व वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी चाळीसगांव शहर वाहतूक शाखेच्या वतीने लवकरच विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा व चित्रलेखन स्पर्धा घेणार असल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली. शहर वाहतूक शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला.

रॅलीत यांची होती उपस्थिती
रॅली मध्ये चालतांना इयत्ता 7 वी चा विद्यार्थी चेतन सुनिल चव्हाण याला रस्त्यावर पडलेले 250 रूपये सापडल्याने त्याने ते पैसे तात्काळ शिक्षक व्ही.एल.पाटील, ए.पी.वाघ यांना दिले. चौकशी केल्यानंतर पैसे कुणाचे आहेत हे समजले नाही म्हणून त्या विद्यार्थ्याला ते पैसे बक्षीस म्हणून देण्यात आले. रॅलीमध्ये शहर वाहतूक पोलीस शाखेचे हवालदार राजेश रावते, राजेंद्र मगर, हेमंत शिरसाठ, नरेंद्र सूर्यवंशी, अरुण बाविस्कर, पोलीस नाईक विजय शिंदे, पो.कॉ. सतीश राजपूत, नंदकिशोर निकम, भास्कर भोसले, राजेंद्र सोनवणे, प्रवीण सपकाळे, प्रशांत पाटील, सचिन अडावदकर, राजेंद्र निकम अजय भोई, आदी कर्मचारी सहभागी झाले होते.