रस्ता लूट : दुसर्‍या आरोपीला अटक ; मुद्देमाल जप्त

साकेगावजवळील शेतकर्‍यासह मारहाण करीत झाली होती रस्ता लूट : तिसरा आरोपी अद्यापही पसार

भुसावळ : भाजीपाला घेण्यासाठी निघालेल्या साकेगावच्या शेतकर्‍याला मारहाण करीत लूटण्यात आल्याची घटना महामार्गावर घडली होती. या प्रकरणी सुरूवातीला गुन्हे शाखेने आदर्श बाळू तायडे उर्फ डफली याला गुअटक केली होती तर दुसरा पसार आरोपी यांना अमोल राजेंद्र चौधरी यास तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिणे दोन हजार रुपये रोख असा सुमारे एक लाख 58 हजार रुपयांचा चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात अद्याप तिसरा संशयीत पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे तर दोन्ही आरोपींची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

यांनी आवल्या मुसक्या
तालुक्यातील साकेगाव येथील विनोद बजरंग परदेशी (रा.साकेगाव) हे किराणा व्यावसायीक तसेच शेतकरी सोमवार, 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ते दुचाकीने साकेगाव शिवारातील महामार्गालगतच्या शेतात भाजीपाला आणण्यासाठी निघाले असता सिनेस्टाईल दूचाकीने आलेल्या तिघा आरोपींनी त्यांना मारहाण करीत लुटले होते. पोलिसांनी या प्रकरणी आदर्श बाळू तायडे उर्फ डफली (चांदमारी माळ, भुसावळ) व अमोल चौधरी (रा.साकेगाव) यांना अटक केली. आरोपींकडून सोन्याचे दागिणे, दुचाकी (एम.एच.19 डी.आर.5042) ज्युपीटर गाडी व दोन हजार रुपये रोख, मोबाईल आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, यूनूस शेख, विठ्ठल फुसे, विजय पोहेकर, रीयाजोद्दिन काझी, जगदीश पाटील यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.