रस्ता अडवत २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग करीत मारहाण : तिघांविरोधात गुन्हा दाखल

Molestation of engineering students in Bhusawal : Crime against the trilo भुसावळ : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी त्रिकूटाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल
शहरातील एका भागातील २२ वर्षीय तरुणी अभियांत्रिकीचे शिक्षण घेते मात्र गुरुवार, १७ रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता वरणगाव रोडवरील महादेव मंदिराजवळ संशयीत आरोपी राहुल गोसावी (पूर्ण नाव, गाव माहित नाही) व अन्य दोन अनोळखी दुचाकी (एम.एच.१९ सी.ई.९०५५) आले व त्यांनी तरुणीला थांबण्याचा इशारा केला मात्र तरुणी न थांबल्याने त्यांनी तरुणीला शिविगाळ करीत मारहाण करीत तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तपास नाईक सुनील बारकू जोशी करीत आहेत.