Private Advt

रसलपूर गावात तुंबळ हाणामारी : दोघे जखमी

रावेर : तालुक्यातील रसलपूर येथे किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबात तूफान हाणामारी होवून दोन्ही फिर्यादी जखमी झाले. या प्रकरणी रावेर पोलिसात परस्परविरोधी दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

परस्परविरोधी तक्रार दाखल
रसलपुर येथील नबाब शेख (42) यांचा मुलगा बकर बांधत असतांना नबाब शेख मुलाला शिव्या देत होता. यावरुन हसनुर बी शेख कुरेशी (55) यांनी आपल्याला शिव्या देत असल्याचा समज केला व याचा राग आल्याने दोन्ही कुटुंबात तूफान हाणामारी झाली. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला नबाब शेख यांच्या फिर्यादीवरुन हसनुर शेख, अल्ताफ शेख, ईस्ताक शेख, हंसार शेख अकबर शेख, शबनम शेख यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
तर दुसर्‍या गटातर्फे हसनुर बी.शेख कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन नबाब शेख, मुस्कान शेख, सायराबी शेख, शफीक शेख, अनिस शेख यांच्याविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आला. तपासह हवालदार सतीष सानप करीत आहे.