रसलपुरात घरफोडी : 72 हजारांचा ऐवज लंपास

रावेर : तालुक्यातील रसलपूर येथे घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधत 72 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. वाढत्या चोर्‍यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची चोरट्यांनी साधली संधी
रावेर तालुक्यातील रसलपूर येथील रहिवासी असलेल्या फरजाना बी.शेख शाकिर यांच्या घराचे लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा सोमवारी रात्री तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत बेडरूममधील स्टीलच्या कोठीचे कुलूप चोरट्यांनी तोडून त्यातील 30 हजारांची रोकड व सोन्याचे दागिने मिळून 72 हजारांचा ऐवज लांबवला. याबाबत फरजाना बी.शेख यांनी देलेल्या फिर्यादीवरुन रावेर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवि 457 व 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फौजदार विशाल सोनवणे व सहकारी करत आहे.