रविवार वाघोडसाठी ठरला घातवार: एकाचा रेल्वेतून पडून मृत्यू तर दोघांना ट्रक्टरने उडविले !

0

रावेर: तालुक्यातील वाघोडसाठी रविवार घातवार ठरला आहे. वाघोडच्या युवकाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला आहे. लिलाधर महाजन (21) हा मुंबईतील (विठ्ठल वाडी) येथे कामाला होता. तो मुंबई येथून वाघोडला येत होता. इगतपुरीजवळ रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे वाघोड येथील दोन जणांना अज्ञात वाहनांने उडवून दिले. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहे. वाघोड येथीलच चंद्रकांत शामराव धनगर व
नरेंद्र रघुनाथ पाटील कामानिमित्त मोटससायकलने खानापुरच्या दिशेने जात होते. खानापूरकडून भरधाव वेगाने रावेरच्या दिशेने येणाऱ्या ट्रक्टरने साहेबा हॉटेलजवळ दोघांना उडविले. अपघातानंतर ट्रक्टर चालक घटनास्थळावरुन पसार पसार झाला. वैद्यकीय अधिकारी स्वप्नीशा पाटील यांनी दोघांना पुढील उपचारसाठी जळगाव येथे हलविले आहे.

Copy