रविंद्र माळी यांचा नागपूर येथे अभ्यास दौरा

0

अमलनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील एम.ए. द्वितीय वर्षास राज्यशास्त्र विभागात शिक्षण घेणारा रविंद्र माळी याची नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेषणासाठी अभ्यास दौर्‍यासाठी निवड झाली होती. राष्ट्रकुल संसदीय मंडळ ही संस्था महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही सभागृहात चालणार्‍या कामकाजाचा अभ्यासासाठी राज्य शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत असते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून 6 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात प्रताप महाविद्यालयातून रविंद्र माळी याची निवड करण्यात आली. रविंद्र हा शिरुड येथील रहिवासी असून राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. ललित मोमया, प्रा. विजय तुंटे, प्रा. संदीप नेरकर, प्रा. वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले.