विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे निधन

जळगाव दि.२४(प्रतिनिधी ) महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी ( मुद्रीत शोधक) रमेश डोंगर शिंदे यांचे शनिवारी निधन झाले.
कोरोनामुळे शिंदे हे खासगी दवाखान्यात आठवडाभरापासून दाखल होते.मृत्यूसमयी ते ५४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे.अत्यंत धडाडीचे समजले जाणारे श्री शिंदे हे महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने महासंघाच्या माध्यमातून प्रयत्नशील असायचे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी- अधिकारी संघटनेचेही ते सचिव होते.विद्यापीठात येण्यापूर्वी त्यांनी वृत्तपत्रात मुद्रीत शोधक व उपसंपादक म्हणूनही काही वर्षे काम केले . त्यांच्या निधनाने राज्यातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे