रमजीपूर ग्रामपंचायत अपहार चौकशीसाठी टाळाटाळ

0

रावेर। तालुक्यातील रमजीपुर ग्रामपंचायत मध्ये 2013-15 या कालावधीत केलेला रस्ता, गटार बांधकाम, ग्रामनिधी, पाणी पुरवठा, तेरावा वित्त योजनेत अफरा-तफरी करून अपहार केला असून तो जिल्हास्तरावरुन चौकशी होऊन येथील पंचायत समिती पुढिल कारवाईसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सरपंचासहित काही ग्रामस्थांनी केला आहे.

येथील तत्कालीन ग्रामसेवक प्रविण कोळी व सरपंच असलेल्यांनी त्यावेळेस विविध योजनांमध्ये अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याची लेखी तक्रार जिल्हा परिषदेत केली होती. त्या अनुषंगाने तपासणी सुध्दा झाली काही योजनांमध्ये अपहार झाल्याचे जिल्हा प्रशासनाला कळल्यानंतर येथील पंचायत समितीला ग्रामसेवाकावर कारवाई करण्याच्या सुचना देऊन सुध्दा येथील सहाय्यक गटविकास अधिकारी हबीब तड़वी हे त्याकडे दुर्लक्ष देत पाठीशी घालत आहे. त्यामुळे रमजीपुर ग्रामपंचायत मध्ये बीडीओ यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

या सर्व प्रकरणाचा मी स्वतः काही सदस्य व ग्रामस्थाच्यांमदतीने पाठपुरावा करीत आहे. येथील योजनांमध्ये कसा अपहार झाला याची लेखी तक्रार जिल्हा परिषदेत वेळो-वेळी केली आहे. या सर्व योजनांची तपासणी झाली असता अपहार सिध्द झाला असून येथील पंचायत समिती पुढील कारवाई करून प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना असून सुध्दा त्याकडे सहाय्यक बीडीओ हबीब तड़वी दुर्लक्ष करीत असून उलट तोच ग्रामसेवक आमच्याकडे देण्याचे सांगत आहे. मागील एक महिन्यापासून ग्रामपंचायतला ग्रामसेवक नसल्याने अनेक कामे प्रलंबित पडलेले आहे. पुढील कारवाई न झाल्यास आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल.
अरुण महाजन, सरपंच, रमजीपुर

येथील ग्रामपंचायत माझ्या मतदारासंघातील असून येथील अपहार प्रकरण 2013-15 या कालावधीतील असून तपासणी अहवालामध्ये अपहार झाल्याचे सिध्द होत असल्यास येथील पंचायत समिति अधिकारी का? दुर्लक्ष करत आहे याबाबत प्रश्नच आहे लवकरच तेथे नवीन ग्रामसेवकासाठी प्रयत्न करणार असून येणार्‍या जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सभेला हा मुद्दा उचलून सरपंच व ग्रामस्थांना न्याय मिळवन देईल.
 नंदा पाटील, जिल्हा परिषद सदस्या