रमजानच्या महिन्यात संचारबंदीचे पालन करावे

0

नंदुरबार -‍  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत शासनाच्या विलगीकरण पालन करण्याच्या सुचनांचे आणि संचारबंदीच्या नियमांचे पालन पवित्र रमजानच्या महिन्यातदेखील कटाक्षाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये. घराच्या छतावर, मोकळ्या मैदानावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी.
सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे.

लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सुचनांचे पालन करण्यात यावे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 आणि भारतीय दंड संहितेमधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Copy