रणबीरच्या नावाचा टॅटू हटवून दीपिकाने केली आयुष्याची नवीन सुरवात

0

मुंबई : बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि बुलीवूडचा बाजीराव रणवीर सिंग १४ व १५ नोव्हेंबरला लग्नबेडीत अडकले आणि दिपवीर या नावाने ओळखले जाऊ लागले. नुकतेच ‘दीपवीर’ रिसेप्शन पार्टीसाठी बँगलोरला रवाना झाले. यादरम्यान, विमानतळावर दोघांना स्पॉट करण्यात आले. यावेळी दीपिकामध्ये एका नवीन गोष्टीचे निरीक्षण करण्यात आले. दीपिकाने रणबीरच्या नावाचे टॅटू हटवले आहे.

जेव्हा रणबीर आणि दीपिका एकमेकांना देत करत होते त्यावेळी दीपिकाने रणबीरच्या प्रेमात आपल्या मानेवर रणबीरच्या नावाचा टॅटू काढला होता. या टॅटूत ‘RK’ असे नाव तिने लिहिले होते. मात्र, काही कारणास्तव दोघांचे ब्रेकअप झाले आणि दीपिकाचे टॅटू तसेच राहिले.

मात्र, आता दीपिकाने रणवीर सिंगसोबत आयुष्याची नवी सुरुवात केली असून भूतकाळातील गोष्टी मिटवून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.