रझा कॉलनीत अतिक्रमण काढण्यावरून दोन गटांत झडप

0

जळगाव। शहरातील अक्सा नगरातील रझा कॉलनीत अतिक्रमण काढण्यावरून तक्रारदार व अतिक्रमणकर्त्यांमध्ये दुपारी 2 वाजता वाद झाला. यात दोघांकडून एक दुसर्‍यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. रझा कॉलनीतील जोहराबी शेख यांनी अतिक्रमण करत किरणा दुकान बांधले होते. या दुकानाविषयी तक्रार आल्याने अतिक्रमण निर्मुलन पथक रझा कॉलनीत पोहचले होते. यावेळी पथकास 10 बाय 12 चे अतिक्रमणीत दुकान दिसून आले. पथाकाकडून अतिक्रमण काढले जात असतांना अतिक्रमणधारक तक्रारदारांमध्ये झडप झाली.

दोघांमधील वाढत जाऊन दोघाकडील लोकांनी एक दुसर्‍याच्या घरावर दगडफेक केली. त्यांनी एक दूसर्‍यांच्या घरांवर दगडफेक केल्याने दोन जण जखमी झाले आहेत. तक्रारदार व अतिक्रमणधारकांमधील वाद जवळपास अर्धा तास सुरू होता. दोघ गटाकडून दगडफेक होत असतांना परिसरातील दोनशे-तीनशे बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. वाद घालणार्‍यांना समजाविण्यासाठी गर्दीतून कोणीही पुढे आले नाहीत. हा वाद जवळपास अर्धा सुरू होता. दरम्यान, अतिक्रमण निर्मुलन पथकाने जवळपास 2 तासात अतिक्रमीत दुकान पाडले. याप्रसंगी आतीष राणा, सालीद अली, हरीश सोनवणे, दत्तु भामरे, अमित सोनवणे, अरूण मोरे आदींनी अतिक्रमीत दुकान पाडले.