रंभाने वयाच्या चाळीशीत दिलं तिसऱ्या मुलाला जन्म

0

मुंबई : नव्वदच्या दशकातली बॉलिवूड अभिनेत्री रंभा तिसऱ्यांदा आई झाली आहे. रंभाने इन्स्टाग्रामवर ‘ ब्लेस्ड विथ बेबी बॉय’ असे लिहून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

२३ सप्टेंबरला रंभाने माऊन्ट सीनई हॉस्पिटल, टोरंटो येथे तिसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. याआधी रंभाला दोन मुली आहेत. रंभाने सलमान खानसोबत ‘जुडवा’ आणि ‘बंधन’ सारख्या हिट चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटातही तिने काम केले आहे.

Copy