योगी आदित्यनाथ म्हणतात, हनुमान हे दलित होते; ब्राह्मण महासभेकडून नोटीस

0

जयपुर- उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान यांना दलित म्हटले आहे. त्यामुळे ब्राह्मण महासभेने त्यांना नोटीस पाठविली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी माफी मागावी अशी मागणी ब्राह्मण महासभेने केले आहे. ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पं.सुरेश मिश्रा यांनी ही नोटीस पाठविली आहे.

बजरंगबली यांचा अपमान असून करोडो देशवासीयांच्या भावना यामुळे दुखविले गेले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. तीन दिवसात माफी न मागितल्यास पुढील कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

Copy