येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू

0

नाशिक : येवला-मनमाड मार्गावर अनकाई बारी येथे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन महिला, दोन पुरुष तसंच एका लहान मुलाचा समावेश आहे. बुधवारी (२१ नोव्हेंबर) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

आयशर ट्रक आणि एर्टिगा कार यांची जोरदार धडक झाल्यानं हा अपघात घडला आहे. मृत्युमुखी पडलेले नगर जिल्ह्यातील रहिवाशी असून ते एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा समोरील भाग संपूर्ण चक्का चुर झाला आहे.

Copy