येरवडा कारागृहातून दोन कैदी फरार

0

पुणे:- येरवडा कारागृहातून दोन कैदी फरार झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. बाथरूमच्या खिडकीचे गज वाकवून दोन कैदी फरार झाल्याने कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. फरार झालेल्या कैद्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहाजवळ भरण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून हर्षद सय्यद वय 20 कासारवाडी व आकाश बाबूलाल पवार वय 24 काळेवाडी पिंपरी हे दोन कैदी फरार झाले. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरी चोरी खुनाचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे तपास पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कायद्यांचा शोध सुरू केला आहे. दोन आठवड्यापूर्वी देखील एका कैद्याने येरवडा कारागृहातून पलायनाचा प्रयत्न केला होता.