युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

0

जळगाव- मुळजी जेठा महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात युवा स्पंदन स्नेहसंमेलन 2016 या कार्यक्रमाचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. के उद्घाटन के.सी.ई. सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश बी. पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व द्विपप्रज्वलाने झाली़ यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ़ उदय कुलकर्णी ,डॉ. आर.टी. महाजन, वाणिय शाोच्या समन्वयीका डॉ कल्पना नंदनवार कला शाोच्या समन्वयीका डॉ प्रज्ञा जंगले, उप उप्राचार्य, प्रा. पी.डी.भोळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा़ एस ओ उभाळे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा़ यु.व्ही.पाटील, डॉ़ सी पी लभाने, समन्वयक प्रा़ आर बी ठाकरे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा़ पी बी चौधरी उपस्थित होते.

 तिकीट, नाण्यांचे आकर्षण
संगीत विभागाच्या प्रा. प्रिया सायोडे यांनी सरस्वती वंदन गायन करून कार्यक्रमाला सुरूवात केली. यानंतर हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन अ‍ॅड. प्रकाश.बी.पाटील यांनी केले़ यात 40 विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन होते. यात यश संजय पाटील या विद्यार्थ्याने टिशु पेपर पासुन बनविलेले पर्यावरण पुरक आकाश कंदील होता. रेवती निकम व निलांबरी जावळे या विद्यार्थ्यानी संग्रहीत केलेल्या विविध देशांच्या पोस्टाची तिकीटे व नाणे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. जयना पंचमीया या विद्यार्थीनीने टाकावु वस्तु पासुन नक्षीदार आरती थाळी बनविलेली होती. मनिष पाटील याने पक्षी तज्ञ सलीम अली यांचे व मयुरी सोलस हिने लॅार्ड बुध्द यांचे काढलेले स्केच सर्व प्रेक्षकांचे मन वेधुन घेत होते.

रांगोळ्यातून दिला स्त्रीभ्रुणहत्याचा संदेश
मेंहंदी स्पर्धेत अरेबीक व पारंपारिक मेंहदी प्रकार काढुन मुलींनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थीनी सोबतच विद्यार्थ्यांनी सुध्दा विशेष सहभाग नोंदविला त्यात प्रदुषण ,बेटी बचाव, स्त्रीभ्रुणहत्या, पर्यावरण संवर्धन विषयी संदेश देणार्‍या रांगोळया होत्या. या स्पर्धचे परिक्षक म्हणुन कौमुदीनी नारोडे यांनी कामकाज पाहिले. यांनतर काव्यवाचन व उत्फूर्त भाषण स्पर्धेचे उदघाटन झाले़ यात 18 विद्यार्थ्यांनी काव्यवाचन व उत्फूर्त भाषण स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलायात योगीनी पाटील हिने सादर केलेली कविता अरे माणसा माणसा व सुरज बिर्ला याने सादर केलेली आई बाबा थोडे बोलायच आहे. या कवितांनी सर्वांची मने तृप्त करुन टाकली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कविवर्य अशोक चौधरी सर व प्रा. मनोज महाजन यांनी काम पाहिले.

खाद्य पदार्थांची 25 स्टॉल
स्नेहसंमेलनातील फुड फेस्टीवलचे उद्घाटन अ‍ॅड. प्रकाश बी पाटील यांनी केक कापून केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करुन प्रदर्शनात ठेवलेले होते़ यात एकूण 25 स्टॉल होते, त्यात मॉकटेल ड्रींक्स, फ्रॅकी,कॉर्नकचोरी, व्हेज इडली. समोसा, . चाट,., पाणीपूरी, कांदाभजी, ., मसाला चने.दाळपकवान ,भरीत व कळण्याची पूरी या चविष्ठ पदार्थांचा समोवश होता़ या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ प्रज्ञा जंगले व डॉ उवला नेहेते यांनी काम पाहिले़ यावेळी मनोरंजक अश्या हास्य-प्रधान ोळांचे आयोजन करण्यात आलेले होते.यात मटका फोड, तीन पायी शर्यत, पीठातून नाणे शोधने, रस्सी ोच या ोळांचा समावेश होता विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्फूर्त सहभाग नोंदविला़. मैदानी खेळात क्रिकेटचे सामने आयोजीत केले होते यात एकुण 32 संघानी सहभाग नोंदविला अंतिम सामन्याचे विजेते एम.जे.किंग तर उपविजेते अल्टीमेट चॅलेजर संघ ठरले.