युवा नेतृत्व व समुदाय विकास कार्यशाळा समारोप

0

चाळीसगाव । नेहरू युवा केंद्र जळगाव व साद फाऊंडेशन चाळीसगाव यांच्या सयुक्त विद्यमाने युवा नेतृत्व व समुदाय विकास कार्यशाळेचा समारोप समारंभ नुकताच येथील के की मूस कलादालन येथे प्राचार्य डॉ. एस.आर. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.की.मुस प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकन गायकवाड होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.गौतम निकम, कमलाकर सामंत, दिलीप चव्हाण उपस्थित होते. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिबीरार्थी यांनी मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांचे मार्गदर्शन; यांनी घेतले परीश्रम

यात राहुल धात्रक, संकेत मोरे, सुवर्णा बोरसे, भैरवी खोंडे, प्रियंका भोसले यांचा समावेश होता. कार्यशाळेत झालेले प्रबोधन हे दैनदिन आयुष्यात आचरणात आणू असा आशावाद विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक गौतम निकम यांनी स्वयंदीप व्हा, असे आवाहन आपल्या मनोगतातून केले. कमलाकर सामंत यांनी वेळेचे महत्व सांगितले तर प्राचार्य डॉ. एस.आर.जाधव यांनी विविध संदर्भ देत उज्वल भविष्यासाठी अभ्यासाचे महत्व विषद केले. भिकन गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनातून शिबीरार्थींना शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन कल्पतेश देशमुख यांनी केले तर आभार विजया ठाकूर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेमंत तोंडे, वैशाली निकम, सागर नागणे, विजया ठाकूर, पवन राणा, सागर अगोणे, प्रा. विजया चव्हाण यांनी परिश्रम घेतले.