स्वच्छतेने शहर झाले चकाचक

0

 

जळगाव । महानगर पालिकेतर्फे संत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने मंगळवारी सकाळी 7 ते 11 या वेळात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ संत गाडगेबाबा उद्यानातील संत गाडगे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी महापौर नितीन लढ्ढा, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी सभापती प्रा. वर्षा खडके, महिला व बालकल्याण सभापती कांचन सोनवणे, आयुक्त जीवन सोनवणे, महास्वच्छता अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर अशोक जैन, जनता बँकेचे चेअरमन प्राचार्य अनिल राव, केशवस्मृतीचे भरत अमळकर, शिवाजीराव पाटील, महानगर पालिका विरोधी पक्षगट नेते सुनील माळी, नगरसेवक अमर जैन, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यासह महानगरपालिकेली विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सहभाग नोंदवला होता.

या अभियानात 377 संस्था 22 हजारांपेक्षा जास्त सदस्य सहभागी झाले होते. या अभियानात संस्थानी स्वतः निवडलेल्या ठिकाणी स्वच्छता केली. यात 30 मुख्य रस्ते, धार्मिकस्थळे, शासकीय कार्यालये, मैदाने, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, स्मशानभूमी, कब्रस्तान या प्रमुख ठिकाणांचा समावेश होता. या महास्वच्छता अभियानात संस्था, शासकीय कार्यालये, शाळा, बँकेतील कर्मचारी, विद्यार्थ्यानी गटागटाने सहभागी होत स्वच्छता करण्यात आली. यात काही नागरिकांनी वैयक्तीकरित्या सहभागी नोंदविला. त्यानी आपले घर, घराचा परिसर, जवळचा रस्ता यांची स्वच्छता करून या महास्वच्छता अभियानात वैयक्तीक सहभाग नोंदविला. तसेच संस्था, संघटना नागरिकांनी अभियान राबवताना ज्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली, त्या ठिकाणचा स्वच्छतेपूर्वीचा, स्वच्छता करतानांचा आणि स्वच्छता झाल्यानंतरचे असे तीन फोटो महानगर पालिकेकडून मागविण्यात आले होते.

जैन इरिगेशनतर्फे खराटे, प्लास्टिकच्या घमेली
अभियानासाठी शहरातील सुमारे 85 ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले होते. संस्थांना अभियानासाठी जागांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जैन इरिगेशनतर्फे महापालिकेला खराटे प्लास्टिकच्या घमेली कचरा उचलण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. जैन तसेच महानगर पालिका 4 जेसीबी, 24 ट्रॅक्टर, 37 घंटागाडी व 20 डंपर यांनी शहरातील स्वयंसेवकांनी जमा केलेला कचरा उचलण्याचे काम केले.

समांतररस्त्यावरही सपाटीकरण
याच अभियानांतर्गत शहरातून जाणार्‍या महामार्गाला लागून असलेल्या समांतर रस्त्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा मातीचे ढीग आहेत. त्यामुळे रस्ता असून नसल्यासारखा आहे. त्यामुळे जेसीबीच्या सहायाने मातीचे ढीग सपाटीकरण करण्यात येणार असून कचरा माती डंपरच्या माध्यमातून वाहून नेण्यात आला.
गल्लीबोळातहीकरता येईल काम

आपले जळगाव स्वच्छ जळगाव म्हणत वार्ड क्र. 13 च्या नगरसेविका प्रतीभा कापसे व आबा कापसे व नागरिकांनी पिंप्राळा येथील हनुमान मंदिर व परिसरात महास्वच्छता अभियानात सामील होत परिसराची स्वच्छता केली.

प्र.क्र. 28 मध्ये स्वच्छता अभियानात नगरसेवक रविंद्र चंद्रकांत पाटील व मनपा कर्मचारी तसेच वॉर्डातील नागरीकांनी गिरणा टाकी परिसर, आस्वाद चौक, सुयोग कॉलनी, रामदास कॉलनी, सागर पार्क परीसर व वॉर्डातील संपुर्ण कॉलन्यांतील नागरीकांनी सहभागी होऊन परिसरात स्वच्छता केली.

वाड क्रं 23 अ मध्ये साविञी नगर सदोबा नगर येथे स्वच्छता अभियानात नगरसेविका ममता कोल्हे व संजू भाऊ कोल्हे ,अतूल वायकोळे ,आरोग्य दूत गजेंन्द्र खडके व महिला व मिञ मंडळी यांनी परिसर स्वच्छ करत महास्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग घेतला.

सुभाष चौक नागरी पतसंस्थेच्या चेअरमन व कर्मचार्‍यांनी नवीपेठ परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी चेअरमन श्रीकांत खटोड, आदित्य खटोड, विजय जगताप व भरत शाह या अभियानात अधिक योगदान म्हणुन पतसंस्थेच्या वतीने महानगर पालिकेला 100 खराटेझाडु भेट देण्यात आले.

बालाजी पेठ परीसरात महास्वच्छता अभियानातंर्गत वार्ड नं. 21 जितेंद्र मुंदडा सोबत सर्व मित्र परिवार सहभागी झाले होते.

शासकीय तंत्रनिकेत परिसरात तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थित बोंडे सर, एन.एस. जगताप, एन.ए. मराठे, एस.बी.चौधरी, जे.के. बागूल, बी.टी. पाटील, सोनल देवरे, पी.बी. पाटील, व्ही.एम. येवले, एम.जी. भंडारे, अरूण अहिरे, केशव बच्छाव, डी.एल. जाधव, अनिल गावंडे, एन.बी. आहेरे आदी उपस्थित होते.

रामेश्वर कॉलनी येथे संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबवतांना श्री गृप मित्र मंडळाचे भुषण सोनवणे, अनिल घुले, जयेश पाटील, दिपक मांडोळे, नरेंद्र जाधव, भुषण जोशी, बंटी गरुड, योगेश वाणी, विशाल देशमुख, श्रीकांत सोनवणे, मंगेश जोशी, चंद्रकांत ठाकरे आदी.

युवाशक्ती, युवा विकास फाऊंडेशनचा मनपा महास्वच्छता अभियानात सहभाग
युवाविकास फाऊडेशन, युवाशक्ती फाऊडेशन यांनी काव्यरत्नावली चौक,गणेशवाडी परिसरात स्वच्छता मोहिम राबत परिसर स्वच्छ केला.यावेळी संस्थेचे पदाधिकारी स्वयंसेवक, माजी महापौर विष्णु भंगाळे, युवाशक्तीचे अध्यक्ष विराज कावडीया सचिव अमित जगताप, संजय चौधरी उपस्थित होते. यावेळी परिसरातील रहिवास जयेश ढाके यांनी जेसीबी उपलब्ध करुन दिले. यावेळी पटांगण स्वच्छ करण्यात आले 4 ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला. परिसराती गटारी, कचराकुड्या, रस्ते स्वच्छ करण्यात आले.यावेळी युवाशक्ती फाऊडेशनचे तेजस श्रीमाळ, नवल गोपाल, मितेश गुजर भुषण सोनवणे, पृथ्वी मैनपुरी, कल्पेश श्रीमाळ, विपिन कावडीया, संदिप सुर्यवंशी, राहुल चव्हाण, दीपक धनजे यांनी परिश्रम घेतले. युवा विकास फाऊडेशनचे महेंद्र पाटील, प्रा.सुरेश अत्तरदे, बिपीन झोपे, राजेश वारके, हेमंत पाटील, विवेक महाजन, विकी काळे, सचिन पाटील, विकी भंगाळे, सचिन महाजन, प्रफुल सरोदे, सुकलाल भोजने यांनी कामकाज पाहिले.

विद्यार्थ्यानी मनपा महास्वच्छता अभियानात सहगाभागी
शहरातील सिध्दी विनायक विद्यालय अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यानी शहरातील अयोध्यानगर परिसरातील सदगुरुनगर,श्रीनगर, कौतिक नगर, म्हाडा कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, मंदीर परिसर रामनगर परिसर, अपना घर कॉलनी या ठिकाणी महाविद्यालयन विद्यार्थ्यानी रत्यावरील कचरा, गटारीच्या बाजुस असलेले गवत काढुन परिसर स्वच्छ केला. यावेळी शाळेचे शिक्षक, महानगरपालिका कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक नरेश सोनवणे, बाळा सोनवणे मुख्याध्यापक आर. पी. खोडपे, गुलाब पाटील यावेळी विद्यार्थ्यांना सोभत महास्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यानी स्वच्छतेचे साहित्य स्वतःच आणले होते.

रिपाई(अ)महिला आघाडीच्यावतीने अभिवादन
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास महिला आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठवलेगट च्या वतीने गाडगे महाराज उद्यान येथे पुतळ्यास तालुका अध्यक्ष रमा ढिवरे, जिल्हा उपअध्यक्ष, नितीन अस्मार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले, यावेळी महानगर कार्यअध्य सागर सपकाळे यांनी गाडगे महाराज यांच्या जीवन कार्याबद्दल सांगितले. यावेळी लता वाघ,रेखा जाधव,सुरेखा बेडसे,अनिल आराक, इश्‍वर चंद्रे, किरण कोळी, बबलु सपकाळे, निलिमा वरणकर, शोभा खैरनार, किरण सोनवणे, हर्षाली सोनार, सुलोचना माळी, गोपाल वंजारी, भिमराव सोनवणे, नवल बाविस्कर, सागर धनुरर्धर, राहुल मोरे, पुजा सुतार, सुनिता वाघ उपस्थित होते.

रेल्वे स्टेशन, नेहरु चौक, गोविदा स्टॉप हॉकर्सने मनपा महास्वच्छता अभियानास सहभाग
जळगाव – महास्वच्छता अभियानात रेल्वे स्टेशन, नेहरु चौक, गोविंदा स्टॉप हॉकर्सने केली परिसरात स्वच्छता यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवहारलाल नेहरु पुतळ्यास आभिवादन केले. या स्वच्छतेची दखल घेत शहराचे आमदार सुरेश भोळे, आयुक्त जिवन सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे यांनी कार्यक्रमास शाबासकी देत अशाच प्रकारे परिसर स्वच्छ ठेवत राहा आसा संदेश परिसरातील नगरिकांना दिल्या. या कार्यक्रमासाठी अशफाक बागवान,श्रावण अहिरे, दगडु चौधरी,शांताराम अहिरे,आसिफ बागवान, कालूभाई चायवाले, रमेश, विकास पोतदार इत्यांदीनी कामकाज पाहिले.

रिपाई तर्फे संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला मार्ल्यापाण
जळगाव- शहरातील रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(अ)तर्फे पक्ष कार्यालयात संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमीत्त प्रतिमापुज्यन माल्यापर्ण करण्यात आले यावेळी महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, जळगाव विभाग अध्यक्ष दिपक सपकाळे, जिल्हा सचिव भरत मोरे, यशवंत घोडेस्वार, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, महिला आघाडीच्या सुमन इंगळे, महानगर युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, कमगार अध्यक्ष भिमराव सोनवणे, जगदिश शिरसाळे, भिकन ठाकरे, पुनम जोहरे, सागर गायकवाड, किरण अडकमोल, बापु धामणे, पारधे अशोक, पृथ्वी गायकवाड, सचिन अडकमोल, मुकेश टिल्लारे उपस्थित होते.

न्यायालय परिसर झाला स्वच्छ
जिल्हा सत्र न्यायालय व परिसरात जळगाव जिल्हा वकील संघातर्फे महास्वच्छता अभियानाची सुरूवात जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.ए. लव्हेकर, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, आयुक्त जीवन सोनवणे, वकील संघाचे लक्ष्णम वाणी यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाची करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा न्यायाधिश आर. जे. कटारीया, ए.व्ही. कस्तुरे, मुख्य न्यायदंडाधिकारी कुलकर्णी, आर.एम. मिश्रा, एस. एस. घोरपडे, आर. एम. भाकरे, आर.बी. ठाकूर, पाखले मॅडम, अ‍ॅड. स्वाती निकम, अ‍ॅड. गोविंदा तिवारी, अ‍ॅड. अनुराधा वाणी आदी सहभागी झाले होते.

.