युवाशक्तीचा गोरगरीबांसह पतंगोत्सव

युवाशक्ती फाऊंडेशन व साई मोरया गृप यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी मकर संक्रांती निमित्त पतंगोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासकीय नियमांचे पालन करीत 50 लोकांमध्ये सदर पतंगोत्सव पार पडला. 

खोटे नगर चौकातील मैदानावर शुक्रवारी सकाळी 10 ते दुपरी 2 वाजेपर्यंत गोरगरीब मुला-मुलींसह पतंगोत्सवाचे आयोजन युवाशक्तीतर्फे करण्यात आले होते. उडी उडी जाय, पंतंग तेरी उडी उडी जाय; चली चली रे पतंग मेरी चली रे; ढिल दे ढिल दे दे रे भैय्या; यासह एकाहून एक सुपरहीट गाण्यांच्या तालावर चिमुकल्यांनी संक्रांत निमित्त मनसोक्त पतंग उडविण्याचा आनंद लुटला.गोरगरीबांनी सहभाग घेतल्याने या महोत्सवाला एक वेगळीच रंगत आली होती. यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, साई मोरया गृप चे अध्यक्ष उमाकांत जाधव, सिंद्धांत कदम, प्रसन्न जाधव, प्रितम शिंदे, पराग पाटील, सुदर्शन इशी इत्यादी उपस्थित होते. या महोत्सवामार्फत वंचित मुला-मुलींच्या जीवनात उत्साह आणण्याचा प्रयत्न आयोजकांतर्फे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नायलॉन व चायनीज मांजावर बंदी असल्याने आयोजकांनी पर्यावरणपूरक मांजा पुण्याहून मागविला होता. हा नायलॉन विरहीत मांजा उपस्थित मुलामुलींना देण्यात आला. यासह छोटा भिम, सिंघम, पतलू मोटू, टॉम ॲण्ड जेरी, तिरंगा व इतर मुलांना भावतील अशा कलाकृतींच्या पतंगाचा समावेश करण्यात आला होता.

यावेळी उपस्थितांना तिळगुळाचे वाटप सुद्धा करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक सण व उत्सवांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे युवाशक्ती फाऊंडेशन व साई मोरया गृप यांच्या तर्फे सदर पतंगोत्सव आयोजित करून गोर गरीबांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याचा छाटासा प्रयत्न करण्यात आला.