Private Advt

युवारंग महोत्सवात मूजेला सर्वसाधारण विजेतेपद

शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवात जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपड्याचा संघ उपविजेता ठरला.

19 पैकी 12 वेळेस मूजेकडे विजेतेपद
आतापर्यंत 19 वेळा युवारंग महोत्सव झाला. त्यात सर्वाधिक 12 वेळा विजेतेपद अन् चार वेळेस उपविजेतेपद हे मूळजी जेठा महाविद्यालयाला मिळाले आहे. यंदा सलग दुसर्‍या वर्षी मूजेने शहादा येथे विजेतेपद मिळवले. एकूण पाच कला प्रकारांपैकी चार प्रकारात प्रथम आणि एकामध्ये विभागून विजेतेपद मिळवून स्पर्धकांनी विविध कला प्रकारांमध्ये 12 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक तर 2 कांस्य पदक मिळवले.