युवक बेपत्ता; हरविल्याची नोंद

0

जळगाव। सेट्रींग कामाला जातो सांगून घरातून निघून गेलेला युवक परतल्याच नसल्याने त्याच्या आईने दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती.

शहरातील शाहूनगर ट्राफिक गार्डन समोर राहणारा विद्याधर उर्फ वैभव राजेंद्र सिरसाठ वय-21 हा 27 एप्रिल 2017 रोजी सकाळी 8 वाजता सेट्रींग कामाला जातो सांगून घरातून निघून गेला. त्यानंतर विद्याधर हा घरीच परतला नसल्याने त्याची आई शारदा राजेंद्र सिरसाठ यांनी 30 रोजी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणाचा पूढील तपास राजेंद्र परदेशी हे करीत आहेत. दरम्यान, युवकाबद्दल काही माहिती मिळाल्यास शहर पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.