युतीमधील ‘सामना’ सुरुच!

0

मुंबई। निवडणुका संपल्या. निकालही घोषीत झाले. पण भाजप शिवसेना युतीमधील राजकीय सामना काही आटोपताना दिसत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना सोबत येणार नसेल तर भाजपसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत राज्यातील सत्ता भागीदाराला अप्रत्यक्षरीत्या इशाराच दिला आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दाणवे यांनी घरी येऊन निमंत्रण दिले असतानाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांयकाळपर्यंत औरंगाबादला जाणे टाळल्याने तेही बहुधा सलगीच्या विचारात नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, माफिया डॉन अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी या शिवसेनाभवनवर पोहचताच त्यांना भाजपकडून बोलावणे आल्याने त्या तेथे गेल्या. यामुळे नगरसेवकांसाठीची आपल्याकडे ओढण्यासाठीची खेचाखेचीही सुरुच असल्याचे स्पष्ट झाले आहे.