युगांडाचे पंतप्रधान यांचे मुंबईत आगमन

0

मुंबई : युगांडा देशाचे पंतप्रधान रुहकाना रुगुंडा यांचे आज सकाळी नऊला मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्निक आगमन झाले. राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी शामलाल गोयल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.

याप्रसंगी राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव नागनाथ भोगे, मुंबईतील युगांडाचे ऑनररी कौन्सल जनरल मधुसुदन अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.