‘या’ ठिकाणी एका दिवसात ३०० कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक दारुविक्री

0

लखनौ – देशातील अनेक राज्यांत ४० दिवसांहून अधिक काळानंतर सोमवारी मद्याची दुकाने उघडली गेल्यानंतर मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचे पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशात दारुविक्रीने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. एका अंदाजानुसार, एका दिवसात तब्बल ३०० कोटी रुपयांची दारुविक्री झाल्याची माहिती आहे. यातून युपी सरकारला पहिल्याच दिवसाच्या दारुविक्रीतून १०० कोटींचा कर मिळाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारच्या परवानगीनंतर सोमवारपासून अनेक राज्यांमध्ये दारूची दुकाने उघडल्यामुळे वाईन शॉपच्या बाहेर तोबा गर्दी झाली होती. सकाळी दुकाने खुली होण्यापूर्वीच दुकानाबाहेर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे काही दारु दुकानातील दारु संध्याकाळपर्यंत संपली होती. त्यामुळे, दुकाने वेळेआधीच बंद करण्यात आली. मात्र यामुळे अनेक ठिकाणी सोशल डिन्स्टसिंगचे तीनतेरा वाजलेले दिसले. त्यातूनच एका दिवसातील दारुविक्रीचे रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत. त्यामुळेच दिल्ली सरकारनेही मद्यावर अतिरिक्त ७० टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात येणार आहे. उत्त्तर प्रदेशात लखनौ येथे ८ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली आहे. तर डझनभर जिल्ह्यांमध्ये ५ कोटी रुपयांची दारुविक्री झाल्याची माहिती आहे.

Copy