Private Advt

यावल शहरात बंदला व्यापार्‍यांकडून संमिश्र प्रतिसाद

यावल : महाविकास आघाडीच्या बंदला यावल शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर बहुतांश दुकानदारांनी दुकाने उघडली. सोशल मिडीयावर भाजपा व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकामेकांशी चांगलेच एकमेकांना खेटताना दिसून आले. सोमवारी यावल शहरात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजेपासून नागरीकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यास शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर बहुतांश भागात दुकाने पुर्ववत सुरू झाली.

यांनी केले बंदचे आवाहन
जिल्हा परीषदेचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर सोनवणे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, इंटक जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.मुकेश येवले, सेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, सेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, सुनील बारी, कडू पाटील, अब्दुल सईद, अमोल भिरूड, वढोदा सरपंच संदीप सोनवणे, काँग्रेस उपाध्यक्ष पुंड बारी, अनिल जंजाळे, अजय बढे, जालिंदर कोळी, हाजी गफ्फार शाह, प्रसन्न देशमुख, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, बामणोद सरपंच राहुल तायडे, विक्की गजरे, नईम शेख, शेख सकलेन, अब्दुल गनी, गोलु माळी, पप्पू जोशी, जगदीश धांडे, प्रसन्न किरंगे, उल्हास नेमाडे, दिनु नाना पाटील, देवकांत पाटील, हितेश गजरे, किशोर माळी, सुकदेव बोदडे, कामराज घारु, डॉ.हेमंत येवले, राहुल चौधरी भालोद, भैया पाटील, करीम मन्यार, अब्दुल सईद, निवृत्ती धांडे, विजय साळी, ड.निवृत्ती पाटील, समाधान पाटील, अरुण पाटील, निलेश बेलदार, भागवत आटवाल, अय्युब खान, गोपाळ काकडे, पवन पाटील, विलास येवले, यशवंत अडकमोल, अविनाश तायडे, सागर शिंदे, संजय भोई, प्रमोद पाटील (किनगाव), युवराज भास्कर, करण तायडे, डॉ.विवेक अडकमोल, विजय भोई, किरण भोई, नरेंद्र शिंदे, मयुर पाटील, नानसिंग बारेला, अजय मोरे, द्वारका पाटील, श्यामल भावसार, नरसिंग बारेला आदींनी व्यापार्‍यांना बंदचे आवाहन केले.