यावल शहरात त्रिकुटाची कुटुंबास मारहाण

A family was beaten up by a trio near JDCC Bank in Yawal City यावल : शहरातील जेडीसीसी बँकेसमोर त्रिकूटाने कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिविगाळ केल्याचा जाब विचारल्याने मारहाण
शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. जेडीसीसी बँके जवळील रहिवासी विनोद बळीराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराजवळील मोहन प्रदीप बडगुजर, संगीता प्रदीप बडगुजर व डिंपल प्रदीप बडगुजर हे शिवीगाळ करत होते. फिर्यादी यांनी तुम्ही शिविगाळ का करत आहात? असे विचारल्याचा राग आल्याने तिघांनी फिर्यादी विनोद जाधव याला मारहाण केली तर भांडण सोडवण्यास आलेल्या फिर्यादीच्या पत्नी दीपाली जाधव व फिर्यादी यांची आई देवकाबाई यांनादेखील यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहेत.