Private Advt

यावल शहरातून तरुणाची दुचाकी लंपास

यावल : पैश्यांसाठी गहाण ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार यावल-चोपडा रोडवरील साई हॉटेल येथे 25 डिसेंबर रोजी उघडकीला आला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गहाण ठेवलेली दुचाकी लंपास
समीर जहाँगीर तडवी (29, रा.हरीओम नगर, यावल, ह.मु.तडवी कॉलनी, रावेर) हे खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एम.एच.19 डी.सी. 1875) क्रमांकाची दुचाकी असून पैश्यांची आवश्यकता असल्याने यावल-चोपडा रोडवरील साई हॉटेलचे माक धीरज पाटील यांच्याकडून 15 हजार रुपये घेवून 9 सप्टेंबर 2021 रोजी दुचाकी गहाण ठेवली व दुचाकी हॉटेलजवळ पार्किंगला लावली होती. दरम्यान, 25 डिसेंबर 2021 रोजी त्यांची 80 हजार रुपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. आठ दिवसानंतर सोमवार, 3 जानेवारी रोजी दुपारी यावल पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.