Private Advt

यावल शहरातील अविवाहित तरुणाची आत्महत्या

यावल : शहरातील शिवाजी नगर भागातील एका 35 वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भूषण बापू सुर्यवंशी (35) असे मयताचे नाव आहे.

मध्यरात्री घेतला गळफास
भूषण हा अविवाहित तरुण घरात एकटा असताना त्याने मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या छतास असलेल्या लाकडाच्या दांड्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. नातेवाईकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत मयताचे मामा ज्ञानेश्वर अर्जुन कोल्हे यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.