Private Advt

यावल वनविभागाची कारवाई : सागवान लाकूड जप्त

यावल : वनविभागाच्या गस्ती पथकाने बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील परीसरात कारवाई करीत सागवान जातीचे लाकुड जप्त केले. गुरुवारी शहरातील बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील प्रार्थनास्थळ परीसरात विनापरवाना अवैधरित्या सागवान जातीच्या ईमारती लाकुडांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सहा.वनसंरक्षक पी.व्ही.हाडपे व त्यांच्यासोबत असलेले यावल पश्चिम वनक्षेत्रातील यावलच्या गस्ती पथकातील वनपाल, वनसंरक्षक, पोलिस नाईक, वाहनचालक यांच्या पथकाने आठ हजार रुपये किंमतीचे सागवान लाकूड जप्त केले.