यावल येथे 35 वाहनांवर कारवाई

0

यावल । यावल पोलिसांनी 1 ते 15 एप्रिलदरम्यान मोटार वाहन कायद्यान्वये कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात शहरात येणार्‍या चोपडा, भुसावळ फैजपूर या तिन्ही प्रमुख मार्गांवर सकाळ, सायंकाळी वाहन तपासणी सुरू असून तीन दिवसात 35 वाहनांवर कारवाई झाली. राज्यात अपघातांचे प्रमाण वाढते आहेत. यामुळे नाशिक विभागीय विशेष पोलिस महासंचालक विनय चौबे यांनी विभागात 1 ते 15 एप्रिलदरम्यान मोटार वाहन कायद्यान्वये विशेष कारवाई मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार फैजपूरचे डीवायएसपी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे निरीक्षक बळीराम हिरे, सहायक निरिक्षक योगेश तांदळे, उपनिरीक्षक अशोक आहिरे, वाहतूक शाखेचे जाकीर सय्यद, हवालदार संजीव चौधरी, सिकंदर तडवी, संजय देवरे आदींनी बर्‍हाणपूर-अंकलेश्वर मार्ग, भुसावळसह शहरात वाहतूक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यात पहिल्या तीन दिवसात 25 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच शहरातून जाणार्‍या चोपडा, भुसावळ फैजपूर रस्त्यावर सकाळ-सायंकाळी नियमित तपासणी सुरू आहे.

कारवाई दरम्यान 5 हजार 600 रूपये दंड वसूल करण्यात आला. तर सात वाहनचालकांना कोर्टाचा मेमो देण्यात आला. यामुळे वाहनचालकांमध्ये काराईची धास्ती वाढली आहे. कोणतेही वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन गरजेचे आहे. यामुळे कारवाई टाळता येते. विशेष म्हणजे स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट, शिटबेल्टचा वापर करावा. वाहन चालवण्याचा परवाना, कागदपत्रे सोबत ठेवावी. सुरू केलेल्या माहिमेत सातत्य ठेवू असे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी सांगितले.