Private Advt

यावल-फैजपूर रस्त्यावर अपघात : जखमी यावलच्या सहाय्यक तलाठ्याचा अखेर मृत्यू

यावल : यावल-फैजपूर रस्त्यावरील चितोडा गावाजवळ दुचाकी व अ‍ॅपे रीक्षाचा अपघात होवून तिघे जखमी झाल्याची तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार, 9 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात यावल येथील सहाय्यक तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

अ‍ॅपे-दुचाकीत झाला होता अपघात
यावल शहरातील सहाय्यक तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे (50, रा.फैजपूर) हे गुरुवारी आपले कामकाज आटोपून सायंकाळी सहा वाजता दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.यु. 6217) द्वारे घराकडे फैजपूरला निघाले असताना तर फैजपूरकडून अ‍ॅपे रीक्षा (क्रमांक एम. एच. 19 एस. 2577) व्दारे चालक शेख सलीम शेख गफ्फार (35) व सैय्यद अबू बकर सैय्यद इब्राहिम (32, दोघे रा.डांगपूरा यावल) हे यावलकडे येत असताना या दोघा वाहनांचा चितोडा गावाजवळ अपघात झाला. यात तिघे जण जखमी झाले जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले तर राजेंद्र झांबरे यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना गोदावरीत हलवण्यात आले मात्र शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मयत झांबरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.