यावल पोलिस निरीक्षकपदी राकेश मानगावकर

यावल : यावल पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकपदी राकेश मानगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी जिल्हा पोलिस डॉ.प्रवीण मुंढे यांनी याबाबतचे आदेश काढले. यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक तथा आयपीएस आशीत कांबळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या रीक्त जागी नियंत्रण कक्षातील निरीक्षक दिलीप भागवत यांची तात्पुरता बदली करण्यात आली होती मात्र गुरुवारी पोलिस अधीक्षकांनी मानगावकर यांच्या नियुक्तीचे आदेश काढले असून मानगावकर यांनी गुरुवारी सायंकाळी भागवत यांच्याकडून पदभार स्वीकारला. शहर व तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यास प्रथम प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.