Private Advt

यावल तालुक्यात दुचाकी चोरी : चौघा दुचाकी चोरट्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

यावल : यावल तालुक्यातील दुचाकी चोरी प्रकरणात चार आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवार, 14 रोजी आरोपींना यावल न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. साकळी येथील दुचाकी चोरी प्रकरणी शंकर नथ्थु कोळी (28, शिरसाड) यास अटक केल्यानंतर अन्य तीन संशयीतांची नावे समोर आली होती. पोलिसांनी शंकर नथ्थू कोळी (28), पुरूषोत्तम चंद्रसिंग लोधी (32), निलेश उदयसिंग लोधी (24) व धनराज उर्फ मयुर प्रकाश सोनार (तिघे रा.साकळी) यांना अटक करण्यात आली होती. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाचपोळे करीत आहे.