यावल तालुक्यात झेडपी, पं.स.मध्ये भाजपाची बाजी

0

यावल । तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाचपैकी तीन गटात भाजप, दोन गटात काँग्रेसने विजय मिळविला. किनगाव-डांभूर्णी गटात काँग्रेसच्या अरुणा पाटील 7538 मतांनी विजयी झाल्या. शैलजा पाटील 6374 (भाजप), सुशिला कोळी 5463 (शिवसेना) मिळाली. हिंगोणा-सावखेडा गट भाजपा उमेदवार सविता भालेराव 8582 मतांनी विजयी झाल्या. मंगला अंबोरे (काँग्रेस) 7998, शोभा तायडे (शिवसेना) 1 788 मते मिळाली. साकळी – दहिगाव गट रवींद्र पाटील (भाजप) 13734 मतांनी विजय तर संदीप सोनवणे (काँग्रेस) 5 666 मते. भालोद-पाडळसे गटात नंदा पकाळे (भाजप) 7350, ज्ञानदेव दांडगे (काँग्रेस) 4 हजार 386, संदीप घोलप (शिवसेना) 1720. न्हावी-बामणोद गटात प्रभाकर सोनवणे (काँग्रेस) 9324 मतांनी विजय मिळविला तर अलिशान तडवी (भाजप) यांना 816 मते मिळाली. पंचायत समितीच्या 10 जागांचे निकाल (भाजप 5, काँग्रेस 4, 1 अपक्ष).

गणनिहाय उमेदवारांना मतदान
किनगाव गण – उमकांत पाटील काँग्रेस 4 हजार 949 मतांनी विजयी झाले. तर शिवसेनेचे प्रशांत पाटील यांना 1 हजार 823 मते मिळाली. भाजपा उमेदवार विजय बोरसे यांना 2924 मते प्राप्त झाली. डांभूर्णी गण – पल्लवी चौधरी अपक्ष 3284 मतांनी विजय मिळविला तर शिवसेनेच्या भाविका पाटील यांना 1516, काँग्रेसच्या मनिषा पाटील यांना 2 हजार 983, भाजपाच्या सुलोचना सोळुंके यांना 1946 मते मिळाली. सावखेडा गण – काँग्रेसच्या उमेदवार शेखर सोपान पाटील यांना 4573 मतांनी विजय मिळाला तर रोहिदास अडकमोल यांना 301, भाजपाचे लिना पाटील यांना 4 हजार 472, अपक्ष सुनिल भालेराव 184 मते प्राप्त झाली. हिंगोणे गण – भाजपा उमेदवार योगेश भंगाळे हे 3971 मतांनी विजयी झाले. तर शिवसेनेचे कोमल पाटील यांना 1127, काँग्रेसचे भुषण भोळे यांना 3892 मते मिळाली. न्हावी गण – सर्फराज तडवी काँग्रेस – 5418 मते मिळवून विजयी झाले. भाजपा उमेदवार रसुल तडवी यांना 4419 मते मिळाली. बामणोद – कलिमा तडवी – काँग्रेस- 3837 मतांनी विजय प्राप्त झाला. दहिगाव गण – संध्या किशोर महाजन – भाजप-5753 मतांनी विजयी झाल्या * साकळी गण – दीपक पाटील – भाजप – 4723 विजयी झाले. * भालोद गण – लताबाई कोळी – भाजप – 4230, काँग्रेस उमेदवार लक्ष्मी तायडे 2038 मते मिळाली. * पाडळसे गण – लक्ष्मीबाई विजय मोरे – भाजप – 3623 मते तर काँग्रेसच्या रेखा सपकाळे यांना 2570 मते मिळाली. शिवसेनेच्या सुरेखा तायडे यांना 1250 मते, अपक्ष सुरेखा वानखेडे यांना 306 मते मिळाली.