यावल तालुक्यात गावठी दारूविरुद्ध धाडसत्र : तीन भट्ट्या उद्ध्वस्त

0

यावल : तालुक्यातील पिंप्री गाव शिवातील तापी नदीच्या काठी असलेल्या तीन गावठी दारूच्या हातभट्यांवर यावल पोलिसांनी गुरूवारी कारवाई करीत या भट्ट्या उध्वस्त केल्यात तर आरोपी पसार झाले.

गोपनीय माहितीवरून कारवाई : कारवाईचे स्वागत
यावल तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अंजाळे व परीसरात मोठ्या प्रमाणात अत्यंत घातक रसायन द्वारे गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची व विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना मिळाली होती. गुरुवार, 9 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आपल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकासह भालशिव पीप्री गाव शिवारातील तापी नदीच्या काठावर काहीजण हे बेकायदेशीररित्या तीन ठिकाणी हातभट्टीची गावठी दारू तयार करताना दिसून आल्यानंतर या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या तर पोलिसांना पाहताच आरोपी पसार झाले. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व पोलीस कर्मचारी यांनी सुमारे चार हजार लिटर गावठी दारू पाळण्याचे पक्के रसायन नष्ट केले व 50 लिटर तयार दारू हस्तगत केली. या संदर्भात यावल पोलीस स्टेशनला त्या अज्ञात फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Copy