Private Advt

यावल तालुक्यातील 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता

यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथून 28 वर्षीय विवाहिता माहेरी जात असल्याचे सांगून घरातून निघाली मात्र अद्यापही घरी न पोहोचल्याने यावल पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. प्रीती योगेश नेमाडे (28) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे

यावल पोलिसात हरवल्याची नोंद
प्रीती नेमाडे या आठ व चार वर्षीय मुलांसह व पतीसह सांगवी येथे वास्तव्यास आहेत. शनिवार, 19 मार्च रोजी सकाळी आपण माहेरी अंजाळे येथे जात असल्याचे सांगून विवाहिता घराबाहेर पडल्या मात्र अंजाळे येथे पोहोचल्याच नाही. पती योगेश मनोहर नेमाडे यांनी सर्वत्र पत्नीचा शोध घेतला मात्र विवाहिता न आढळल्याने सोमवारी यावल पोलिस हरवलल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे.